Breaking News
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना NSE देणार १ कोटींची मदत
मुंबई - 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराने (NSE) मृतांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. NSE चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO आशिष चौहान यांनी सोशल मीडियावर ही घोषणा केली. रिलायन्स इंडस्ट्रीजने रिलायन्स फाउंडेशन मुंबईतील सर एचएन रुग्णालयात सर्व जखमींवर मोफत उपचार करण्याची घोषणा केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant