NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

अडसूळ ट्रस्ट कॅरम सराव शिबिरात नील, सारा, देविका सर्वोत्तम

अडसूळ ट्रस्ट कॅरम सराव शिबिरात नील, सारा, देविका सर्वोत्तम

मुंबई - माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र-कामगार दिनानिमित्त 1 मेपासून 4 दिवस होण्राया विनाशुल्क शालेय खेळाडूंच्या सांघिक सुपर लीग कॅरम स्पर्धा पूर्व तयारीच्या सराव मार्गदर्शन शिबिरात उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू नील म्हात्रे, सारा देवन, देविका जोशी यांनी सर्वोत्तम प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार पटकाविला. ज्येष्ठ कॅरम मार्गदर्शक सचिन शिंदे, चंद्रकांत करंगुटकर, संतोष जाधव, अविनाश महाडिक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी शालेय खेळाडूंना मार्गदर्शन केले.  

     सुमती सेवा मंडळाचे क्रीडा प्रमुख प्रमोद पार्टे, क्रीडा शिक्षक प्रॉमिस सैतवडेकर, संदीप दळवी  यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरु झालेल्या मोफत मार्गदर्शन व सराव शिबिरातील स्पर्धात्मक निर्णायक फेरीमध्ये नील म्हात्रेने सारा देवनला 8-4 असे चकविले. यावेळी आनंदराव प्लॅटीनियम, गोविंदराव फायटर्स, कॅप्टन अभिजित, आत्माराम मोरे प्रतिष्ठान, एमडीसी ज्वेलर्स, सिबिईयु वॉरीयर्स, सुमती क्वीन, फेअर प्ले, अविनाश नलावडे स्पोर्ट्स, दिलीप स्ट्रायकर्स, राणे ऑप्टीशीयंस, सुरेश फिनिशर्स आदी संघातील विविध जिह्यामधील राष्ट्रीय ख्यातीच्या सबज्युनियर कॅरमपटूसह शालेय 36 खेळाडू जाहीर करण्यात आले. ही स्पर्धा 1 ते 4 मे दरम्यान दादर-पश्चिम येथील को-ऑप.बँक एम्प्लॉईज युनियन सभागृहात 12 संघांमध्ये साखळी सामन्यांद्वारे रंगणार आहेत. पूर्णपणे विनाशुल्क असलेल्या कॅरम उपक्रमात शालेय खेळाडूंना टी शर्ट, स्ट्रायकर, पुरस्कार दिले जाणार असून तज्ञांचे मार्गदर्शन देखील मोफत लाभणार आहे.  


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट