Breaking News
शिवसेनेच्या सचिवपदी सुधीर साळवी यांची नियुक्ती
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सुधीर साळवी यांची शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. ही माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या अधिकृत पत्रकाद्वारे देण्यात आली.
सुधीर साळवी हे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारिणीत गेल्या 35 वर्षांपासून सक्रिय असून, मागील 20 वर्षांपासून ते मंडळाचे मानद सचिव म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडत आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान असून, ते ग्लेनईगल्स हॉस्पिटल तसेच महर्षी दयानंद कॉलेजचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. सुधीर साळवी यांच्या अनुभवाचा आणि सेवाभावाचा फायदा पक्ष संघटनात्मक कार्यात निश्चितच होईल, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर