NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

नाहीतर जनसुरक्षा कायद्या विरोधात रस्त्यावर उतरू, आमदार सचिन‌ अहिर‌ यांचा इशारा

नाहीतर जनसुरक्षा कायद्या विरोधात रस्त्यावर उतरू, आमदार सचिन‌ अहिर‌ यांचा इशारा    

   मुंबई - जनसुरक्षा कायद्या‌ला विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आम्ही विरोधी पक्षाचे आमदार  कसुन विरोध करू, तरीही राज्य सरकारने हा कायदा लादला तर त्या विरूद्ध कामगार संघटना, राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था एकत्रित रस्त्यावर उतरून प्रखर आवाज उडवतील,असा सज्जड इशारा भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आमदार सचिन भाऊ अहिर यांनी येथे जन सुरक्षा कायद्या विरोधात वांद्रे येथील जिल्हाध्यक्ष कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या,निषेध आंदोलनात बोलताना दिला आहे.

  लोकशाही विरोधातील जन सुरक्षा कायदा रद्द करा आणि कामगार विरोधी फोर कोड बिल मागे घ्या, या मागण्यांसाठी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगार संघटनांच्या वतीने निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते.त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षही सामील झाले होते. 

   त्या वेळी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटिच्या अध्यक्षा‌ खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेची पायमल्ली करणारे हे जनसुरक्षा विधेयक असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य,जनता गोरगरिबांच्या भाषण स्वातंत्र्या वर एवढेच काय पण पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्या-या या कायद्याला विरोध करावाच लागेल.

   सीपीएम नेते प्रकाश रेड्डी म्हणाले,कार्पोरेट धार्जिणे फडणवीस सरकार कामगार विरोधी कायदे आणून कामगार वर्गाला नेस्तनाबूत करू पाहत आहे.शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव म्हणाल्या,भाषावाद,  जातीयवाद निर्माण करणारे हे सरकार जनसुरक्षा कायदा आणत आहे. तेव्हा यांचे डोके ठिकाणावर येईपर्यंत हे‌ आंदोलन चालू राहील. 

   आमदार सचिन अहिर यांनी आपल्या भाषणात, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.येत्या वीस मे रोजी जन सुरक्षा कायदा आणि चार श्रम संहिते विरोधी जो‌ कामगार संघटनांनी भारत बंदचा नारा दिला आहे, त्याची आठवण करून देऊन कामगार विरोधी सरकारचा आपल्या भाषणात निषेध केला आहे.

  आजच्या आंदोलनात कॉंग्रेस,उबाठा,शरद पवार राष्ट्रवादी या राजकीय पक्षांसह आयटक,इंटक, सीटू, एआयसीसीटीयु,टीयुसीआय,

सर्व श्रमिक संघटना, बुक्टू, भारतीय महिला फेडरेशन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना,महिला सभा, अत्याचारी विरोधी मंच, एआयवायएफ, पुरोगामी युवक संघटना, एआयएसएफ, एसएफआय,पुरोगामी विद्यार्थी संघटना,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लाल निशान पक्ष,समाजवादी पक्ष,जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र,कामगार संघटना आणि सामाजिक संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. 

 ‌‌ महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात जनसुरक्षा विधेयक रद्द करा आणि चार श्रम संहिता मागे घ्या,या मागण्यांसाठी कामगार संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन,झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करीत आहेत,असे कॉ.प्रकाश रेड्डी यांनी सांगितले.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट