Breaking News
बेरोजगारीच्या प्रश्नवर कॉंग्रेस-इंटकला एकत्र लढावे लागेल! कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन
मुंबई - इंटक आणि कॉंग्रेस एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.दोघांचेही कार्य परस्परास पुरक असावयास हवे.जो पर्यंत कॉंग्रेस आणि इंटक एकत्र येऊन लढत नाहीत,तो पर्यंत कामगा रांचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत,असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशा ध्यक्ष आमदार हर्शवर्धन सपकाळ यांनी येथे इंटक मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.
राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक)ची विस्तारित कार्यकरणी व राज्यस्तरीय संमेलन गुरुवारी परळच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात संपन्न झाले. त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार हर्षवर्धन सपकाळ प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.याप्रसंगी महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, कार्याध्यक्ष निवृत्ती देसाई, कोषाध्यक्ष दिवाकर दळवी,मुकेश छ. तिगोटे,बजरंग चव्हाण,दादाराव डोंगरे,जी.बी.गावडे,केंद्रीय इंटकचे सरचिटणीस संजय सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रदेश काँग्रेस आणि इंटकमधील क्षीण होत चाललेले संबंध द्रृढ करावे लागतील,असे सांगून हर्शवर्धन सपकाळ म्हणाले,आज गरिबी आणि श्रीमंती मधील दरी कमी होणे गरजेचे आहे.आजचे उद्योगपती व्यापारी होऊ लागले आहेत.निव्वळ पैसे कमवणे एवढाच हेतू समोर ठेवून राहीले तर देशातील कामगारांची बेरोजगारी दूर कशी होणार?त्यातून आऊटसोर्सिंग वाढू लागली आहे.विमानतळा सारख्या अनेक सार्व जनिक उद्योगात आज कंत्राटी पध्दती वाढू लागली आहे.मोदी सरकारने या गोष्टीकडे डोळेझाक केली आहे.कारखान्यातील कामगारांची संख्या कमी होऊ लागली आहे,हे चित्र अतिशय गंभीर आहे.या प्रश्नावर कॉंग्रेस आणि इंटकला एकत्रित लढावे लागेल.आपण आपलाच इतिहास उगाळत बसलो तर कालापव्यय होईल आणि येणारा काळ आपल्याला कदापि माफ करणार नाही,असाही इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणात दिला.
महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम म्हणाले,गरिबी आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर फक्त इंटक आणि कॉंग्रेसच यशस्वीरीत्या लढू शकतात.त्यांनी आपल्या भाषणात केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर प्रहार करून सांगितले,या प्रश्नांवर इंटक आणि कॉंग्रेसला एकत्रच लढावे लागेल.सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आपल्या भाषणात केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणातून आज कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे,यावर आसुड ओढून सांगितले की, इंटकच्या स्थापनेत कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.त्यांनी कामगार चळवळीला नवी दिशा देण्याचे काम केले आहे,हे विसरून चालणार नाही. कोषाध्यक्ष दिवाकर दळवी म्हणाले,कॉंग्रेस नेतृत्वाला देशात आज प्रथमच अपयश येत नाहीये.भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शून्यातून विश्वास निर्माण केला आहे.देशाला एक खंबीर नेतृत्व दिले आणि कामगार वर्गाला नवी स़ंजिवनी दिली आहे.दादाराव डोंगरे, प्रविण वाजपेयी,नंदू खानोलकर आदींनी आपल्या भाषणात सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी कॉंग्रेसला जे शक्तीशाली करण्याचे काम केले, त्याला इतिहासात तोड नाही.बीजेपी सरकारने कॉंग्रेस मुक्त देश करण्याचे नारे दिले.पण काही झाले तरी कॉंग्रेस आज देशात आपले अस्तित्व टिकवून आहे,हे विसरून चालणार नाही. स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर असलेल्या कॉंग्रेसला संपविण्याची भाषा करणाऱ्यांना हेच विचारावे लागेल,की तेव्हा तुम्ही कुठे होतात?असे निर्भिड विचार अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी इंटक कार्यकारिणीत मांडले. महाराष्ट्र इंटकचे मुकेश तिगोटे यांनी सूत्रबद्ध पद्धतीने सभेचे सूत्रसंचालन केल्याने विस्तारित इंटक कार्यकारिणीची सभा उत्तरोत्तर रंगत गेली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे