Breaking News
गुढीपाडव्यानिमित्त विविध शहरांमध्ये शोभायात्रांचा जल्लोष
गुढीपाडव्याच्या पवित्र निमित्ताने आज राज्यभरात विविध शहरांमध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या. हिंदू नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष शोभायात्रांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला. डोंबिवली, गिरगाव आणि ठाणे यासारख्या ठिकाणी एकच जल्लोष पाहायला मिळाला.
गिरगावमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी शोभायात्रेत उत्साहाने सहभाग घेतला. महिलांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बाईकस्वार म्हणून गिरगावमध्ये फेरफटका मारला. विशेष म्हणजे, गिरगावच्या शोभायात्रेत महिलांची बुलेटस्वारीने सगळ्यांचे लक्ष वेधले.
गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. हा दिवस नवीन कार्यांची सुरुवात करण्यासाठी शुभ मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून पत्नी सीतासह अयोध्येला परतले होते, आणि तो दिवस चैत्र शुक्ल प्रतिपदा होता, म्हणूनच या दिवशी गुढीपाडवा साजरा करण्याची परंपरा आहे.
गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि उत्साहाचा प्रतीक. या दिवशी घरासमोर गुढी उभारून तिची पूजा करून नैवेद्य अर्पण केला जातो. तसेच, वसंत ऋतूची सुरुवातही याच दिवशी होते. महाराष्ट्रासह अन्य काही प्रदेशांमध्येही गुढीपाडवा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, आणि या दिनी सर्वांनी नवीन वर्षाचे स्वागत केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade