NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुंबई महानगरपालिकेचे मालमत्ता कराचे उद्दीष्ट्य पूर्ण; ६ हजार १९८ कोटींची विक्रमी वसुली

मुंबई महानगरपालिकेचे मालमत्ता कराचे उद्दीष्ट्य पूर्ण; ६ हजार १९८ कोटींची विक्रमी वसुली

पालिका प्रशासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून ६२०० कोटींचे उत्पन्न मिळेल असे गृहीत धरले होते. वर्षाच्या सुरुवातीला पालिकेने ४९५० कोटी रुपये उत्पन्न गृहीत धरले होते.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने गेल्या आर्थिक वर्षात ६,१९८ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे. मालमत्ता कर संकलनाचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी निर्धारित करण्यात आलेल्या ६ हजार २०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत महानगरपालिकेने ६ हजार १९८ कोटी ०५ लाख रुपये इतके म्हणजेच ९९.९७ टक्के मालमत्ता कराचे संकलन केले आहे. तसेच, अतिरिक्त दंडाच्या स्वरुपात अधिकचे १७८ कोटी ३९ लाख रुपयेही यंदा संकलित करण्यात आले आहेत.

पालिका प्रशासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून ६२०० कोटींचे उत्पन्न मिळेल असे गृहीत धरले होते. वर्षाच्या सुरुवातीला पालिकेने ४९५० कोटी रुपये उत्पन्न गृहीत धरले होते. मात्र नंतर हे उद्दीष्ट वाढवून ६२०० कोटी रुपये करण्यात आले होते. अखेर हे उद्दीष्ट पालिकेच्या यंत्रणेने गाठले.

करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने मालमत्ता कर संकलनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले होते. नागरिकांनी वेळेवर मालमत्ता करभरणा करावा, यासाठी जनजागृती करणे; निर्धारित कालावधीत नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करता यावा यासाठी साप्ताहिक, तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवणे; करभरणा करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देणे; मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करणे, तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी पाठपुरावा करणे, आदी प्रयत्नांचा यामध्ये समावेश होता.

सर्वाधिक मालमत्ता कर वरळीतून

-सर्वाधिक मालमत्ता कर वसुली वरळी प्रभादेवी परिसरातून झाली आहे. त्याखालोखाल अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व, अंधेरी पश्चिम या विभागांनी मालमत्ता कर भरला आहे.

-वरळी, प्रभादेवी – जी दक्षिण – ६२४ कोटी ५० लाख रुपये

-अंधेरी, जोगेश्वरी पूर्व – के पूर्व – ५६८ कोटी ५६ लाख रुपये

-वांद्रे, सांताक्रूझ, खार पूर्व – एच पूर्व – ५२६ कोटी ६४ लाख रुपये

-अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम – के पश्चिम – .५०५ कोटी रुपये

पश्चिम उपनगराचा मालमत्ता करामध्ये मोठा वाटा

- एकूण जमा झालेल्या मालमत्ता करापैकी सुमारे ५० टक्के मालमत्ता कर हा पश्चिम उपनगरातून जमा झाला आहे.

- शहर विभाग – १ हजार ९३३ कोटी २६ लाख रुपये

- पश्चिम उपनगरे – ३ हजार ०३८ कोटी ४९ लाख रुपये

- पूर्व उपनगरे – १ हजार २१८ कोटी ७९ लाख रुपये


रिपोर्टर

संबंधित पोस्ट