NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

भूकंपग्रस्त म्यानमारला भारताकडून ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत तातडीची मदत

भूकंपग्रस्त म्यानमारला भारताकडून ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत तातडीची मदत

नवी दिल्ली - म्यानमारमध्ये झालेल्या शुक्रवारी झालेल्या भीषण भूकंपात कालपर्यंत मृतांचा आकडा १,६४४ ​​वर पोहोचला आहे, तर ३,४०८ हून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि १३९ लोक बेपत्ता आहेत. दुसरीकडे, थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक ३० मजली इमारत कोसळली. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला. संकटाच्या या काळात भारताने तत्परता दाखवत म्यानमारला तातडीची मदत पाठवण्यास सुरुवात केली आहे. ‘ऑपरेशन ब्रह्मा’ (Operation Brahma) अंतर्गत 15 टनांहून अधिक सामग्रीची पहिली मदत यांगून येथे पोहोचली.

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या मदत कार्याची माहिती सोशल मीडियावर दिली. त्यांनी सांगितले की, “‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत म्यानमारला मानवतावादी मदत पुरवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मदत पहिसामग्री यांगून विमानतळावर पोहोचली आहे.”

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी ‘एक्स’वर माहिती देताना नमूद केले की, भारत हा भूकंपग्रस्त म्यानमारला मदतीचा पहिला हात पुढे करणारा देश ठरला आहे. या मदतीमध्ये तंबू, ब्लँकेट, स्लीपिंग बॅग, रेडी-टू-ईट फूड पॅकेट्स, स्वच्छता किट, जनरेटर आणि अत्यावश्यक औषधांसह 15 टन सामग्रीचा समावेश आहे.

या मदत पॅकेजमध्ये तात्पुरत्या निवाऱ्यासाठी तंबू, थंडीपासून बचावासाठी स्लीपिंग बॅग आणि ब्लँकेट, तयार अन्न, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर, स्वच्छतेसाठी हायजीन किट, प्रकाशासाठी सौर दिवे, वीजपुरवठ्यासाठी जनरेटर सेट आणि पॅरासिटामोल, अँटीबायोटिक्स, सिरिंज, हातमोजे आणि पट्ट्या यांसारखी अत्यावश्यक औषधे यांचा समावेश आहे.

दरम्यान, म्यानमारमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दूतावासाच्या माहितीनुसार, या भूकंपात कोणत्याही भारतीय नागरिकाला इजा झाल्याचा अहवाल नाही.

शनिवारी दुपारी ३:३० वाजता म्यानमारमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ मोजण्यात आली. अशाप्रकारे, गेल्या २ दिवसांत ५ पेक्षा जास्त तीव्रतेचे तीन भूकंप झाले.

शुक्रवारी ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर म्यानमारमध्ये मोठे नुकसान झाले. मृतांचा आकडा १० हजारांपेक्षा जास्त असू शकतो. ही भीती युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने व्यक्त केली आहे. भूकंपाचे धक्के थायलंड, बांगलादेश, चीन आणि भारतापर्यंत जाणवले.

शुक्रवारी सकाळी ११:५० वाजता म्यानमारमध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला. म्यानमार आणि थायलंडमध्ये २०० वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप होता. मोठ्या प्रमाणात झालेल्या विध्वंसामुळे म्यानमारच्या सहा राज्यांमध्ये आणि संपूर्ण थायलंडमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट