Breaking News
पतसंस्था नियामक मंडळावर जिजाबा पवार यांची निवड
पुणे - ज्ञानदीप को-ऑप. केडिट सोसायटी लि मुंबई या अग्रगण्य पतसंस्थेचे अध्यक्ष, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसेच महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जिजाबा पवार यांची सहकार विभागाकडून राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळाच्या सदस्यपदी निवड झाली.
यावेळी सूर्यकांत गोविंद जगताप, श्रीकांत जगदीशप्रसाद दुबे, जिजाबा सिताराम पवार, हनुमंत विश्वभर भुसारे आणि शिवाजीराव विष्णू नलावडे या सदस्यांची नियुक्ती केली आहे. सहकारासाठी तळमळीने काम केल्याने त्यांचा हा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया ज्ञानदीपच्या संचालकांनी व्यक्त केली.
जिजाबा पवार यांनी ज्ञानदीपच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. संस्थेच्या राज्यात 110 शाखा, 8 विभागीय कार्यालये व 5 सुसज्ज प्रशिक्षण केंद्रे आहेत. 6,500 कोटींचा संमिश्र व्यवसाय पूर्ण करणारी महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था आहे. 3. लाख सभासद व 2300 कर्मचारी व ठेव प्रतिनिधींच्या कुटुंबाची जबाबदारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून पवार हे समर्थपणे पूर्ण करीत आहेत. त्यांनी मुंबई सहकारी बोर्ड, राज्य फेडरेशनच्या माध्यमातून पतसंस्थांच्या अडचणी सोडविण्याकरीता पाठपुरावा केला आहे.
कोविडनंतर अडचणीतून मार्ग काढण्यासाठी नियुक्त समितीवर सदस्य, पतसंस्था आदर्श उपविधी 2024 दुरुस्ती कमिटीच्या सदस्यपदी ते काम करीत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर