NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

देशातील पहिली कार्बन डेटिंग कालमापन सुविधा मुंबई विद्यापीठात सुरू

देशातील पहिली कार्बन डेटिंग कालमापन सुविधा मुंबई विद्यापीठात सुरू

मुंबई - देशात कार्बन डेटिंगसाठी पहिले एक्सलरेटर सेंटर सुरु करण्याचा बहुमान मुंबई विद्यापीठास मिळाला आहे. आज पासून एक्सलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री, एएमएस मुंबई विद्यापीठात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहे. यासाठी सुमारे २० कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. या प्रगत तंत्रज्ञान सुविधेची पहिली चाचणी आज मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, टीआयएफआरमधील प्राध्यापक एम.एन. वाहिया, एमयु एक्सलरेटर सेंटरच्या प्रमुख प्रा. वर्षा केळकर माने, डॉ. सिद्धार्थ कस्तुरीरंगन आणि डॉ. अभिजीत भोगले यांच्यासह चमुच्या उपस्थितीत करण्यात आली.

आत्तापर्यंत कार्बन डेटिंगसाठीचे नमुने हे परदेशात पाठविले जातात असत यासाठी सुमारे ६०० डॉलर्स खर्च येतो. मात्र आता ही अद्ययावत यंत्रणा आपल्या इथे उपलब्ध झाली आहे. पुरातत्वशास्त्र आणि प्राचीन इतिहासाची उकल करण्यास हे केंद्र सज्ज असून ५० हजार वर्षापूर्वीच्या इतिहासाची अचूक नोंद घेऊन त्याची परीणामकारकता शोधून काढण्याची क्षमता या केंद्राकडे आहे. या सुविधेचा लाभ फक्त मुंबई विद्यापीठापुरताच मर्यादीत न ठेवता या सुविधेचा लाभ सर्व भारतीय शास्त्रज्ञाना आणि उद्योगांना होणार आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट