Breaking News
राज्यातील ४५ रोपवे प्रस्तावांना तत्त्वतः मान्यता
मुंबई - पर्वतमाला ‘ योजनेत राज्यातील ज्या ४५ रोपवे प्रकल्पांना राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे . विशेष म्हणजे राज्यातील सर्वात दुर्गम समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखर आणि हरिश्चंद्रगड या दोन रोपवे योजनांचा समावेश आहे.
कळसुबाई आणि दुर्गराज हरिश्चंद्रगड ही दोन्ही ठिकाणे दुर्ग प्रेमींची, पर्यटकांची आवडती ठिकाणे असून या प्रस्तावित रोपवेमुळे त्या परिसरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. ही दोन्ही शिखरे अकोले तालुक्यात असली तरी अकोल्या लगतच्या इगतपुरी तालुक्यातून कळसुबाई शिखरावर तर जुन्नर तालुक्यातून हरिश्चंद्रगडावर जाण्याचे मार्ग आहेत.
केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडून २०२२-२३ या वर्षाच्या अर्थसंकल्पात ‘राष्ट्रीय रोप वे कार्यक्रम -पर्वतमाला ची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत डोंगराळ प्रदेश, शहरातील अतिगर्दीची ठिकाणे, दुर्गम भागांना रोप वे द्वारे जोडण्यात येणार आहे. यामुळे पर्यटन व धार्मिक स्थळांचे महत्व वाढून पर्यटनास चालना मिळणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर