Breaking News
राज्य सरकार करणार स्वतःहून वारस तपास, सातबारे अद्ययावत
मुंबई - राज्यात जमिनींचे सातबारा उताऱ्यावर अनेक वर्षे मयताची नावेच राहून त्याचा वारस तपास न करता तो सातबारा तसाच पडून राहतो, त्यामुळे अशा सर्व मालमत्तांचा वारस तपास शासन स्वतःहून करून पुढील दीड महिन्यात संबंधित अर्जदाराच्या अर्जाची वाट न पाहता त्या संबंधित सातबाऱ्यावर वारसांची नावे दाखल करण्याची मोहीम राबविण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.
वारस तपास करण्याचे अधिकार संबंधित तहसीलदार यांना देण्यात येतील , त्यासाठी कोणालाही न्यायालयाचा आदेश आणण्याची गरज लागणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व आमदारांनी आपल्या भागातील तहसीलदार , उपविभागीय अधिकारी यांच्या बैठका घेऊन त्याचा पाठपुरावा करावा असे आवाहन बावनकुळे यांनी यावेळी केले. ही मोहीम ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या सातबारा उताऱ्यांसाठी आहे असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade