Breaking News
नागपूरची संचार बंदी पूर्णतः हटविण्यात आली
नागपूर : दुपारी 3 पासून नागपुरातील संचारबंदी पूर्णतः उठविण्यात आली आहे. तहसील, कोतवाली, गणेशपेठ आणि यशोधरा या चार ही पोलिस ठाण्यांतर्गत संचार बंदी पूर्णतः उठविण्यात आल्याचे निर्देश पोलिसांनी जारी केले आहे. पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांनी हे निर्देश जारी केले आहेत. संचारबंदी उठवल्यानंतर पोलिसांमार्फत रूट मार्च काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी नागपूरकरांना आवाहन केले की अफवेवर विश्वास ठेवू नका तसेच सहा दिवसापासून तैनात असलेले पोलीस प्रशासन असेल किंवा अग्निशमन दलाचे जवान असतील यांनी देखील सुटकेचा श्वास सोडला आहे. संचारबंदी उठल्यानंतर नागपूरकरांनी देखील सुटकेचा श्वास सोडला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर