Breaking News
मार्च महिन्यात पाणी पातळीत घट, फळबागा पाण्याअभावी सुकू लागल्या…
जालना -:जालन्यात मार्च महिन्यातच पाणी पातळीत घट झाली असून पुढील दोन महिने जिल्ह्यातील फळबागातदार शेतकऱ्यांसमोर फळबागा जगवण्याचं मोठे आव्हान उभे राहिले आहे. जालना तालुक्यातील उटवद आणि परिसरातील फळबागा पाण्याअभावी सुखत आहेत. जालन्याच्या उटवद आणि परिसरामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या फळबागा वाढवल्या. मात्र, आता पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात मार्च महिन्यातच तापमान 40 अंशापर्यंत पोहोचल्याने वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी खालवत आहे. दरम्यान पुढील दोन ते तीन महिने शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असून पुढील दोन महिने फळबागा टिकवण्याच मोठ आव्हान या फळबागातदार शेतकऱ्यांसमोर असणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade