Breaking News
ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाला केंद्र सरकारची मंजुरी
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील JNPT बंदरापासून चौकपर्यंत सहा पदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग बांधण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातून जाणारा हा सहा पदरी महामार्ग 29 किमी लांबीचा आहे. हा प्रकल्प BoT या पद्धतीने राबवला जाईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 45 शे कोटी रुपये खर्च होणार आहे.
सध्या पळस्पे फाटा, डी-पॉईंट, कळंबोली जंक्शन आणि पनवेल यांसारख्या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होते. यामुळे बंदरातून निघणाऱ्या वाहनांना राष्ट्रीय महामार्ग-48 आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोहोचण्यास 2 ते 3 तास लागतात. लवकरच नवी मुंबई विमानतळ होणार आहे त्यावेळी वाढत्या गर्दीसाठी हा महामार्ग उपयोगी ठरेल.
या प्रकल्पाद्वारे JNPT बंदर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गाशी जोडले जाईल. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये 2 बोगदे खणले जातील, ज्यामुळे मोठ्या कंटेनर ट्रकांना घाटातून जाण्याची गरज भासणार नाही. परिणामी, वाहतूक वेगवान आणि सुलभ होईल. हा सहा पदरी मार्ग बंदराची दळणवळण क्षमता वाढवेल, मालवाहतूक सुरक्षित करेल आणि मुंबई, पुणे तसेच आसपासच्या भागात आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत बंदरांना रस्त्यांनी जोडणे हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. जेएनपीए बंदरातून होणारी कंटेनर वाहतूक सातत्याने वाढत आहे. शिवाय, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आगामी विकासामुळे या परिसरात रस्ते जोडणी अधिक मजबूत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant