मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

सिबिईयु ट्रॉफी जिंकण्यासाठी राज्यातील शालेय ४० कॅरमपटूंमध्ये रविवारी चुरस

सिबिईयु ट्रॉफी जिंकण्यासाठी राज्यातील शालेय ४० कॅरमपटूंमध्ये रविवारी चुरस

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सिबिईयु व न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेड सहकार्याने आयोजित शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेमधील सिबिईयु ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, जैतापूर, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील शालेय सबज्युनियर ४० कॅरमपटूमध्ये रविवारी चुरस राहील. दर्श पटेल वि. रोहित कुदळे आणि उमैर पठाण वि. रोहन पाटील यामधील उद्घाटनीय लढती क्रीडाप्रेमी गोविंदराव मोहिते, प्रमोद पार्टे, अविनाश नलावडे, संयोजक लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत. दादर-पश्चिम येथील सिबिईयु सभागृहामध्ये १६ मार्च रोजी होणाऱ्या स्पर्धेतील पहिल्या ८ विजेत्या-उपविजेत्यांना स्ट्रायकरसह आकर्षक चषकाद्वारे गौरविण्यात येणार आहे.

 विजेतेपदाच्या दावेदारीसाठी शिर्के हायस्कूल-रत्नागिरीचा ओम पारकर, न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत, आयएनजी इंग्लिश स्कूल-वसईचा श्रीशान पालवणकर, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे प्रसाद माने, नील म्हात्रे, वेदांत पाटणकर, देविका जोशी, पोद्दार अकॅडमी-मालाडचे प्रसन्न व पुष्कर गोळे, श्री नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमैर पठाण, श्री महावीर जैन इंग्लिश स्कूल-कल्याणची संचिता मोहिते, आर्या बोडके, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल-कांदिवलीची स्वरी वाडेकर, महिंद्र अकॅडमी-मालाडची श्रिया पवार, ओमकार इंटरनॅशनल स्कूल-डोंबिवलीची हेमांगी पेणकर, प्रेक्षा जैन, आयुषी मनसुख, सुळे गुरुजी शाळेची ग्रीष्मा धामणकर आदी शालेय कॅरमपटू चुरशीच्या लढती देतील. शालेय सबज्युनियर कॅरमपटूना प्रोत्साहन देण्यासाठी को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या सहकार्याने कामगार दिनी मोफत शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर स्पर्धेतील निवडक उदयोन्मुख खेळाडूंना सांघिक प्रतिनिधित्व करण्याची विनाशुल्क संधी लाभणार आहे.

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट