Breaking News
केईएम रुग्णालयाच्या गेटवरील इंग्रजी पाट्याविरोधात शिवसेना (उबाठा गट)चा निषेध आंदोलन
मुंबई महानगरपालिकेच्या सेठ जीएस मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या शतकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने सर्व प्रवेशद्वारांवर नवीन गेट तयार करण्यात आले होते, त्यावर केएम प्रशासनाने इंग्रजीत आद्याक्षरच्या पाट्या लावल्या. यामुळे मराठी भाषेचा अपमान झाल्याची भावना सर्व जनतेत व्यक्त झाली. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असताना, तसेच मराठी पाट्या करण्याचा कोर्टाचा आदेश असाताना देखील 18 ते 22 जानेवारी दरम्यान पार पडलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परदेशी पाहुणे येणार असल्याचे सांगून इंग्रजी पाट्यांचा गेट ठेवण्याचा हट्ट केईएम प्रशासनाने केला होता.
कार्यक्रम संपून दोन महिने उलटले तरी केईएम प्रशासनाने गेटवरील इंग्रजी पाट्या काढले नाहीत. यावर आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली केईएम रुग्णालयाच्या प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. निवेदनात प्रशासनाला तातडीने इंग्रजी पाट्याचे गेट काढून मराठीकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, एक महिना होऊन गेला तरी प्रशासनाने अद्याप कार्यवाही केलेली नाही.
याकारणास्तव शिवसेनेच्या (उबाठा गट) वतीने आंदोलन छेडण्यात आले. शिवसैनिकांनी गेटवर काळे फासत प्रशासनाला इशारा दिला की, तातडीने बदल झाला नाही, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. याची संपूर्ण जबाबदारी केईएम प्रशासनाची असेल.
या आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते मा. नगरसेवक अनिल कोकीळ, दत्ता पोंगडे, सिंधुताई मसुरकर, सचिन पडवळ, श्रद्धा ताई जाधव, शाखाप्रमुख मीनार नाटळकर, किरण तावडे, जयसिंग भोसले, विजय इंदुलकर, बैजू हिंदोळे, महिला उपविभाग संघटक रूपाली चांदे आणि उपशाखाप्रमुख यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी सामान्य नागरिकांनी देखील आंदोलनात सहभाग घेतला आणि इंग्रजी पाट्या असलेल्या गेटच्या वापराचा निषेध केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे