Breaking News
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
मुंबई -आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार राम सुतार यांना 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबद्दल माहिती दिली आहे. राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. राम सुतार यांचं वय 100 वर्ष आहे, आजही ते शिल्प तयार करतात अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.
विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात राम सुतार यांचा 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. सुतार यांनी देशभरात अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या देशातील सर्वात उंच शिल्प पुतळ्याचे कामही त्यांनीच केले होते. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2016 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant