Breaking News
आता हमखास साका विरहीत अस्सल हापूस आंबा मिळणार
कोकण
सिंधुदुर्ग - हापूस आंबा खरेदी करत असताना अनेकदा एका डझनामध्ये काही आंबे हमखास खराब मिळतात . विशेषतः आंब्यामध्ये साका पडलेला असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे मात्र हमखास साका नसलेला आंबा घेणे शक्य होणार आहे. पेटीतील सर्व आंबे चांगल्या प्रतीचे आणि अस्सल हापूस मिळण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक संघाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. आंबा उत्पादक संघाच्या जामसंडे येथील खरेदी विक्री केंद्रामध्ये आंबा स्कॅनिंग मशीन बसवण्यात आली आहे. या मशीनमध्ये साका पडलेला आंबा ओळखता येतो आणि तो वेगळा केला जातो.
याशिवाय या ठिकाणी विकसित करण्यात आलेले विशेष स्टिकर आंब्यावर लावल्याने तो आंबा नेमका कोणाच्या बागेतील आहे आणि अस्सल देवगड हापूस आहे याची देखील ओळख होते. यंदा आंब्याचे उत्पादन काहीसे कमी प्रमाणात असले तरी अस्सल चांगल्या प्रतीचा हापूस आंबा देवगडात आता मिळणे शक्य होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade