Breaking News
मुंबईत महिला वाद्य महोत्सवाचे आयोजन
मुंबई - राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने महिला वाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या तीन दिवसीय महोत्सवात तालवाद्यांची मैफल, जुगलबंदी, भक्तिसंगीतातील वाद्य वादन, तसेच पारंपरिक व पाश्चात्य लोकसंगीताची मैफल सादर होईल.
महिला वाद्य महोत्सव २० ते २२ मार्च २०२५ दरम्यान सायंकाळी ६.३० वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, भायखळा येथे होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पनी अॅड. आशिष शेलार, मा मंत्री सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान यांची आहे. महिला वाद्य महोत्सव सर्वांसाठी निःशुल्क असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विकास खरगे, मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग आणि श्री विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.
गुरुवारी २० मार्च रोजी ‘तालसखी- तालवाद्यांची मैफल’ होईल. याअंतर्गत पंडित रवी चारी- सितार सिम्फनीमध्ये महिलांच्या सतारवादनाचा आनंद घेता येईल. यामध्ये कविता लोटलीकर- खुशी चौगुले आणि २५ महिला सतार वादक साथसंगत, डॉ. मनीषा कुलकर्णी ( हार्मोनियम ), मोहिनी चारी (हार्मोनियम), नेहा मुळये ( पर्कशन), गायत्री पाध्ये ( तबला), उन्मेषा गांगल ( तबला ), भाग्यश्री चारी (ड्रम्स), सलोनी अग्रवाल (कीबोर्ड) सहभागी होतील. त्यानंतर सावनी तळवलकर (तबला), कौशिकी जोगळेकर (लेहरा साथ) या ‘तालसखी’ सादर करतील. तालवाद्य जुगलबंदीमध्ये मुक्ता रास्ते ( तबला), प्रेषिता मोरे (ढोलकी ढोलक) , हमता बाघी ( डफ), सुप्रिया मोडक (हार्मोनियम), उमा देवराज ( कीबोर्ड), किरण बिश्त ( बासरी) यांच्या जुगलबंदीचा आनंद घेता येईल. ताल मॅट्रीक्स ग्रुपची ही प्रस्तुती आहे. सुसंवादिका चैताली कानिटकर यांचे आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade