Breaking News
महानेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन
भायखळा विधानसभा प्रभाग क्रमांक 208 येथे स्वच्छ भारत अभियान व शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दि. 09/03/2025 रोजी महानेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विभागातील गरजूवंत नागरिकांनी मोठ्या संख्येने नेत्र चिकित्सा करून घेतली. शिबिरामध्ये नेत्र चिकित्सा दरम्यान झालेल्या तपासणीमध्ये 70 नागरिकांचे डोळ्यांची सर्जरी व 206 नागरिकांना चष्मा लागल्याचे निदर्शनास आले. तसेच पीडित नागरिकांना नेत्र सर्जरी व चष्मा शांतिदुत सेवा संस्था -अध्यक्ष - श्री.विजय (बुवा) कुलकर्णी यास कडून चष्मा मोफत देण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक करून अनेक शुभेच्छा दिल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर