Breaking News
राष्ट्रवादी सरकार सेलच्या अध्यक्षपदी नंदकुमार काटकर यांची नियुक्ती
मुंबई शहरातील विविध सहकारी संस्थांना भेडसावणाऱया ज्वलंत समस्यां तसेच सहकारी संस्थांच्या प्रलंबित विविध मागण्या सरकार दरबारात प्रखरपणे, अभ्यासूपध्दतीने मांडून समस्या सोडविणारे कार्यसम्राट नंदकुमार काटकर यांची राष्ट्रवादी सरकार सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले. त्यांच्यासारखा उत्कृष्ट वक्ता, सहकारी संस्थांच्या विविध समस्यांना जवळून पाहणारे, बेरोजगार तरुंणांसाठी झटणारे, अनुभवी नेतृत्व या सहकार क्षेत्राला लाभल्याने यापुढेही सहकार क्षेत्राला वेगळी दिशा भेटेल, अशी आशा जनमानसात बळावली आहे. त्याबद्दल विविध स्तरातून काटकर साहेबांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant