मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

कंत्राटदार आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे मुंबईकरांची कोट्यावधी रुपयांची लूटl

मुंबई... (प्रतिनिधी)

 मिठी नदीतील गाळ काढण्याबावत आणि मुंबई शहारातील मोठ्या नाल्यातील साफसफाई करण्याच्या ५०० कोटी रुपयांच्या निविदेतील घोटाळ्याची पुराव्यानिशी पोलखोल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली. 

कंत्राटदार आणि महापालिका अधिकाऱ्यांचं नेमकं काय साटलोटं आहे? त्यांची नेमकी मोडस ॲापरेंडी कशी आहे ते नांदगांवकरांनी सांगितलं.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार कक्षात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहर आणि उपनगरामधील मोठ्या नाल्यांच्या सफाईकरता तसंच मिठी नदी मधील गाळ काढण्याकरता निविदा काढल्या आहेत .

• हे टेंडर तब्बल ५०० कोटी रुपयांचं आहे.

• त्यातील ४०० कोटी रुपयांचं टेंडर अगोदरच कॉन्ट्रॅक्टरच्या संगनमताने (जादा दराने) ओपन केलं आहे.

• तर दोन दिवसांपूर्वी म्हणजे ३ मार्च रोजी मिठी नदी सफाई करता १०० कोटींचे टेंडर काढण्यात आले आहे.

या निविदा प्रक्रियेतील घोटाळ्याच्या मुळाशी जाऊन महत्त्वाचे पुरावे हाती लागल्यानंतर बाळा नांदगांवकर यांनी थेट मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्तांनाही पत्र पाठवलंय.

मुंबईतील मोठ्या नाल्यांची

सफाई आणि मिठी नदीतील

गाळ काढण्यासाठी काढण्यात येणाऱ्या निविदेमध्ये एकाच कंत्राटदाराने त्याच्या ४ ते ५ कंपन्यांसह निविदा दाखल केली.

या कंत्राटदारांनाच सदर काम मिळावं यासाठी अटी, शर्तींमध्ये कमालीचे बदल करण्यात आले.

जेणेकरून विशिष्ट कंत्राटदारालाच ते टेंडर मिळू शकतं. 

केवळ डिस्लटींग काम करणाऱ्या कंपनीला निविदा दिली जावी अशी अट त्यात आहे. त्यात एकाच कंत्राटदाराच्या १) डी.बी. इंटरप्रायझेस, २) एन.एस. रनोजा डेव्हलपमेंट कार्पोरेशन, ३) त्रिदेव इन्फ्राप्रोजेक्ट, ४) तनिषा इंटरप्रायझेस यांनांच काम मिळेल अशाप्रकारची अट टाकून महानगरपालिका आणि सरकारचे नुकसान केले जात आहे. कारण हे सर्व टेंडर जास्त किंमतीने (Above) दिले जात आहे. त्यामुळे महानगरपालिका व सरकारचे किमान २५० कोटींचे नुकसान होत आहे. कंत्राटदाराला १ टन गाळ काढून तो उचलण्यासाठी साधारणतः ₹.१,०००/- ने खर्च होत आहे. मात्र महापालिका त्यां कंत्राटदाराला

रु.२,५००/- अदा करते.त्यामुळे महापालिकेचं प्रति टन ₹.१,५००/- चं नुकसान होत असल्याचं बाळा नांदगांवकर यांनी दाखवून दिलं.

ही जनचेच्या पैशांची लूट होत आहे. हा पैसा मुंबईकरांच्या खिशातील आहे. त्यामुळे सदर निविदा प्रक्रिया रद्द करून, एसआयटी नेमून या भ्रष्टाचाराची चौकशी करावी असं नांदगांवकर म्हणाले.

महापालिकेतील रामगुडे नावाचा असिस्टंट इंजिनियर, केतन कदम नावाचा मशिन सप्लायर,भूपेंद्र, नंदीश नावाचे कंत्राटदार अशा या घोटाळाबहाद्दरांची नावंच नांदगांवकरांनी उघड केली. 

दोषी कंत्राटदार, महापालिका अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी नांदगांवकर यांनी केली आहे.

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट