Breaking News
देशातील सिमेंटच्या दरात मोठी कपात
मुंबई - देशातील पायाभूत सुविधा विकसित होत आहेत. महानगरांमध्ये ठिकठिकाणी इमारतींची पुनर्बांधणी सुरु आहे. तसेच देशात महामार्ग, उड्डाण पुल यांचे बांधकामही वेगाने सुरु आहे. असे असूनही देशात सिमेंटचे उत्पादन गरजेपेक्षा जास्त असल्यामुळे सिमेंटचे दर कमी होत असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत भारतात सिमेंटचे दर साधारणपणे सात टक्क्यांनी कमी झाले आहेत.
कमी मागणी आणि स्पर्धेमुळे सिमेंटच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. IND-Ra या पतमानांकन संस्थेने असे म्हटले आहे. या काळात ५० किलोच्या सिमेंटच्या पोत्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी वार्षिक पातळीवर तुलना केली तर या दरात सात टक्के घट झाली असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे. उन्हाळ्यात म्हणजे चौथ्या तिमाहीत सिमेंटचा वापर वाढतो. त्यामुळे मागणी काही प्रमाणात वाढणार आहे. मात्र एकूणच उत्पादन क्षमता इतकी जास्त आहे की यामुळे सिमेंटच्या दरात वाढ होण्याऐवजी दहा टक्के पर्यंत घट होण्याचीच जास्त शक्यता आहे. अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया भारत, अदानी सिमेंट, श्री सिमेंट या मोठ्या कंपन्यांनी छोट्या कंपन्या विकत घेण्याची मोहीम या वर्षात चालू ठेवली आहे. या संदर्भातील पाच मोठे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे एकूण उत्पादनात मोठ्या कंपन्यांचे योगदान या वर्षात ६० टक्क्यापर्यंत वाढले आहे. आदित्य बिर्ला समूहातील अल्ट्राटेक सिमेंटने इंडिया सिमेंट कंपनीचे अधिग्रहण केले. त्याचबरोबर स्टार सिमेंट कंपनीतही बरीच गुंतवणूक केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant