Breaking News
संगमेश्वर मधील सरदेसाई वाड्यात होणार संभाजी महाराजांचे स्मारक
मुंबई - शौर्याचं प्रतीक असलेले धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना जिथे अटक झाली तो संगमेश्वर येथील सरदेसाई वाडा अधिग्रहीत करून तिथे संभाजी महाराजांचं साजेसं स्मारक राज्य सरकार तयार करेल अशी घोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेमध्ये केली . राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला असलेल्या राजमाता जिजाऊंचा राजवाडा देखील अधिग्रहीत करून त्या ठिकाणी शिवसृष्टी प्राधान्याने उभी केली जाईल, असं देखील मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. पाच वेगवेगळ्या महसुली विभागात शिवसृष्टी उभारली जात आहे अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर