Breaking News
UPI Lite च्या वापरकर्त्यांसाठी NPCI ने आणले नवीन फिचर
नवी दिल्ली - NPCI ने UPI Lite सेवेच्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन सुविधा आणली आहे. याचे नाव ट्रान्सफर आउट आहे.या नवीन फीचर्सच्या मदतीने वापरकर्ते त्यांचे यूपीआय लाइट बॅलन्स थेट बँक बॅलन्समध्ये ट्रान्सफर करू शकतील.नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने २१ फेब्रुवारी २०२५ रोजी एक परिपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे. तसेच, सर्व बँका, पीएसपी बँका आणि यूपीआय अॅप्सना ३१ मार्च २०२५ पर्यंत आवश्यक बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.एनपीसीआयने स्पष्ट केले आहे की सर्वांना ट्रान्सफर आउट फीचर सुरू करावे लागेल. यामुळे वापरकर्ते यूपीआय लाइट बंद न करता त्यांचे यूपीआय लाइट बॅलन्स त्यांच्या बँक खात्यात परत ट्रान्सफर करू शकतील.
UPI Lite ही एक जलद पेमेंट सेवा असून ती कमी किमतीच्या दैनंदिन व्यवहारांसाठी डिझाइन केलेली आहे. हे ५०० रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी पिनशिवाय व्यवहार करण्यास परवानगी देते. ऑक्टोबर २०२४ मध्ये आरबीआयने UPI Lite लाईटची मर्यादा वाढवली होती. NPCI ने UPI Lite सेवा सुरू केली. या सेवेमध्ये तुम्ही पिन न टाकता ऑनलाइन पेमेंट करू शकता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे