Breaking News
IRCTC आणि IRFC ला मिळाला ‘नवरत्न’चा दर्जा
मुंबई - इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC) या कंपन्यांना नवरत्न दर्जा देण्यात आला आहे. आज सरकारने या दोन्ही कंपन्यांना नवरत्न सेंट्रल पब्लिक एंटरप्रायझेसमध्ये अपग्रेड केले. नवरत्न दर्जा मिळाल्याने, रेल्वे क्षेत्राशी संबंधित या दोन्ही कंपन्यांना अधिक आर्थिक स्वायत्तता मिळेल. आता या कंपन्या सरकारी मंजुरीशिवाय १ हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतील.
कंपनीची आर्थिक कामगिरी चांगली असावी. कंपनीचे व्यवस्थापन मजबूत आणि कुशल असले पाहिजे. कंपनीला राष्ट्रीय महत्त्व असले पाहिजे, जसे की ती देशाच्या अर्थव्यवस्थेत किती आणि कोणत्या प्रकारचे योगदान देत आहे. कंपनीमध्ये सरकारी भागभांडवल किमान ५१% असावे. या निकषांची पूर्तता केल्यावर नवरत्न दर्जा दिला जातो.
आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) आयआरसीटीसीचा नफा वार्षिक आधारावर १४% वाढून ३४१ कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी याच तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा ₹३०० कोटी होता.
आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) आयआरएफसीचा नफा वार्षिक आधारावर १.९३% ने वाढून १,६३० कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी याच तिमाहीत निव्वळ नफा ₹१,५९९ कोटी होता
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर