NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुंबई विद्यापीठाने दिक्षांत समारंभात दिली चुकीच्या नावाने प्रमाणपत्रे

मुंबई विद्यापीठाने दिक्षांत समारंभात दिली चुकीच्या नावाने प्रमाणपत्रे

शिक्षण     

मुंबई - सात जानेवारी रोजी मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडला. ज्यात पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. 2023-24 बॅचच्या पदवीधर विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रमाणपत्रावर ‘मुमाबाई विद्यापीठ’ असे लिहिलेले असल्याचे निदर्शनास आले. दीक्षांत समारंभात मुंबई विद्यापीठाने ‘मुंबई’ असे चुकीचे स्पेलिंग असलेल्या पदव्या प्रदान केल्या. या पदवी प्रमाणपत्राबाबत अनेक महाविद्यालयांमधून प्रकरणे समोर आली आहेत. अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठाला परत पाठवले. मुंबई विद्यापीठाने प्रमाणपत्रावर इंग्रजीत ‘मुंबई’ ऐवजी ‘मुमाबाई’ लिहिले आहे. मुंबई विद्यापीठाने दीक्षांत समारंभात सर्व विद्यार्थ्यांना ‘मुमाबाई’ लिहिलेली पदवी प्रमाणपत्र वाटली. ज्यामुळे एकच गोंधळ उडाला.

मुंबई विद्यापीठाने हैदराबाद येथील एका कंपनीला प्रमाणपत्रे छापण्याचे काम दिले होते. छपाईच्या समस्येमुळे काही प्रमाणपत्रांमध्ये चुका झाल्या, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना दिली. किती प्रमाणपत्रांमध्ये त्रुटी होत्या याची आकडेवारी त्यांनी दिली नाही. दरम्यान ‘आम्ही त्यात सुधारणा करत असल्याचेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता नवीन प्रमाणपत्रे मिळतील. सध्या विद्यापीठ प्रमाणपत्र सुधारण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट