Breaking News
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : एमएलडीसी माजी विद्यार्थी संघटनेने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि खुल्या गटांसाठी "नाट्य गीत गायन" स्पर्धा जाहीर केली आहे. सदर स्पर्धा खुला गट आणि महाविद्यालयीन गट अशा दोन गटात होणार आहे. खुल्या गटाची स्पर्धा रविवार, ५ जानेवारी, २०२५ रोजी, तर महाविद्यालयीन गट स्पर्धा शनिवार, ११ जानेवारी, २०२५ रोजी होणार आहे. दोन्ही स्पर्धा सकाळी १० वाजता केशवराव घैसास सभागृह, एम एल डहाणूकर वाणिज्य महाविद्याल, विलेपार्ले येथे सुरू होतील.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे. अधिक माहितीसाठी, इच्छुकांनी मिलिंद बागुल यांच्याशी 8097000625 किंवा माधवी कुलकर्णी 9869027699 या क्रमांकावर सायंकाळी ७ ते ८ या वेळेत संपर्क साधावा.
एमएलडीसी ॲल्युमनी असोसिएशनचा मुंबईचे कार्यवाह स्वप्नील शेणवी यांनी सांगितले की, विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आणि उपक्रम आयोजित करण्याचा यशस्वी इतिहास आहे आणि त्यांना यावेळीही सहभागींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर