Breaking News
पोलीसांनी उधळला निवडणूकीत घातपात घडवण्याचा नक्षलवाद्यांचा कट
गडचिरोली - विधानसभा निवडणूका आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर आता निवडणूका सुरळीत पार पाडण्यासाठी राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गडचिरोलीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर पोलिस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिस दलाच्या सी ६० जवानांनी पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
गेल्या तीन तासापासून गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड सीमेवरील कोपरसीच्या जंगलात नक्षलवादी विरोधी अभियानाचे सी ६० कमांडो आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू झाली. या चकमकीत पाच नक्षलवादीठार मारण्यात जवानांना यश मिळाला आहे. तर या चकमकीत एका जवानाच्या पायाला गोळ्या लागली आहे. जखमी असल्याने त्याला हेलिकॉप्टरने उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलं आहे. हा भाग अबूजमाडच्या जंगलाला लागून असून सॅटेलाईट फोनने जिल्हा मुख्यालयातून संपर्क साधण्यात यश आल्यानंतर ही माहिती पुढे आली आहे. जवानांच्या मदतीसाठी अतिरिक्त मदत पाठवण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विध्वंसक कारवाया करून घातपात घडविण्याच्या उद्देशाने मागील दोन दिवसापासून काही नक्षलवादी एकत्र येऊन कट रचत असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर सावधपणे कारवाईरृकरत पोलीसांनी विधानसभा निवडणूकांदरम्यान घातपात घडवण्याचा नक्षलवाद्यांचा हा कट उधळून लावला. याबाबतची सविस्तर माहिती उद्या आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर