मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पोलिस भरतीमध्ये आदिवासी तरुणांना उंचीत मिळणार सूट

पोलिस भरतीमध्ये आदिवासी तरुणांना उंचीत मिळणार सूट

मुंबई - काटक आणि कणखर शरीरयष्टी असूनही उंची कमी भरल्यामुळे राज्यातील आदिवासी युवकांना अनेकदा पोलीस भरतीला मुकावे लागते. यावर ठोस उपाययोजना करत आता राज्य शासनाने आदिवासी युवकांना पोलीस भरतीमध्ये आवश्यक उंचीमध्ये काहीशी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. उंचीमुळे आदिवासी तरुणांची होणारी कोंडी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली होती. केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रातील पदभरतीमध्ये आदिवासींना उंचीच्या निकषात ५ सेंटिमीटरची सूट द्यावी, अशी मागणी लावून धरली होती.

याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने नियमात सुधारणा केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे, ‘महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश नियम २०११ व महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बलातील सशस्त्र पोलिस शिपाई (पुरुष) सेवाप्रवेश सुधारणा नियम २०१२’ यात आणखी सुधारणा करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करत केळापूर-आर्णी चे आमदार डॉ. संदीप धुर्वे म्हणाले, केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने भारतीय पोलिस सेवा, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स व अन्य सेवेत शारीरिक क्षमता चाचणीत आदिवासींना ५ सेंटिमीटरची सूट दिलेली आहे. राज्यात ही सूट नव्हती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही सूट देऊन राज्यातील आदिवासी समाजाला न्याय दिला आहे. आदिवासी उमेदवारांनी आता या संधीचा लाभ घ्यावा.

या नियमाला आता ‘महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश (सुधारणा) नियम २०२४’ असे संबोधल्या जाणार आहे. त्यानुसार जे आदिवासी उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात, त्यांना उंचीमध्ये ५ सेंटिमीटरची शिथिलता देण्यात आलेली आहे. राज्य सरकारच्या या सकारात्मक निर्णयामुळे आदिवासी उमेदवारांची पोलिस भरतीची वाट सुलभ झाली आहे.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट