Breaking News
श्री तुळजाभवानी देवीजींची मुरली अलंकार महापूजा
धाराशिव - :शारदीय नवरात्र महोत्सवात आज ८ ऑक्टोबर रोजी मंगळवारी सहाव्या माळेच्या दिवशी श्रीतुळजाभवानी देवीजींची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीजींचे हे रुप अत्यंत मनमोहक आहे.श्री तुळजाभवानी देवीजींची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली.पाचव्या माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री. देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे. दररोज नियमित श्री.तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.
उद्या ९ ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा,१० ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि ११ ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे. काल ७ ऑक्टोबर रोजी सोमवारी रात्री १० वाजता पाचव्या माळेच्या दिवशी श्री.देवीजींची छबिना मिरवणूक नंदी वाहनांवरुन काढण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant