Breaking News
पर्यावरण नियम उल्लंघन प्रकरणी मर्सिडीज बेंझला दणका !
मुंबई - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसला कंपनीने आठवडाभरात उत्तर दिले. पर्यावरण नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी मंडळाने कंपनीकडून 25 लाख रुपयांची बँक गॅरंटी घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत बोर्डाने कंपनीला नोटीस बजावली आहे.
मर्सिडीज बेंझच्या चाकणमधील प्रकल्पाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी २३ ऑगस्ट व ४ सप्टेंबरला भेट देऊन तपासणी केली होती. त्यानंतर २१ सप्टेंबरला मंडळाने कंपनीला नोटीस बजावली होती. प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन कंपनीकडून होत नाही, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील क्लॅरिफायर्स आणि सेंट्रीफ्यूज युनिट काम करीत नाहीत, डिझेल इंजिनांसाठीची उत्सर्जन नियंत्रण उपकरणे बसविण्यास सांगूनही त्याचे पालन केलेले नाही, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प योग्यरीत्या चालविला जात नाही आणि त्याची देखभालही केली जात नाही, असा ठपका कंपनीवर ठेवण्यात आला होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे