Breaking News
मांजरा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले…
लातूर - पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे मांजरा धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज 25/09/2024 रोजी दुपारी 12:30 वाजता मांजरा प्रकल्पाचे 2 वक्रद्वारे (1, 6) हे 0.25 मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात 1730 क्यूसेक (49.00 क्यूमेक्स) इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.
तसेच धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे, मांजरा नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे. कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये तसेच कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे