NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

या कारणामुळे बदलली हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख

या कारणामुळे बदलली हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. 90 जागांसाठी 1 ऑक्टोबर ऐवजी 5 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. याशिवाय 8 ऑक्टोबरला निकाल लागणार आहेत. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर करण्याची घोषणाही आयोगाने केली आहे. यापूर्वी दोन्ही राज्यांचे निकाल 4 ऑक्टोबरला लागणार होते.

निवडणूक आयोगाने सांगितले की, राजस्थानच्या अखिल भारतीय बिश्नोई महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आमच्याकडे तारीख बदलण्याची मागणी केली होती. ते म्हणाले की, अनेक पिढ्यांपासून पंजाब, राजस्थान आणि हरियाणातील अनेक कुटुंबे गुरु जंभेश्वरांच्या स्मरणार्थ बिकानेर जिल्ह्यातील ‘असोज’ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी वडिलोपार्जित मुकाम गावात वार्षिक उत्सवात सहभागी होतात.यंदा हा सण 2 ऑक्टोबरला आहे. यामुळे सिरसा, फतेहाबाद आणि हिस्सार येथील हजारो बिश्नोई कुटुंब मतदानाच्या दिवशी राजस्थानला रवाना होतील, त्यामुळे ते 1 ऑक्टोबरला मतदान करू शकणार नाहीत.

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, मतदारांचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवणे आणि शेकडो वर्ष जुन्या परंपरेचा सन्मान करण्यासाठी आम्ही निवडणूक पुढे ढकलत आहोत. बिश्नोई समाजाचे गुरू जांभेश्वर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ३०० वर्षांपासून ही परंपरा समाजाकडून जोपासली जात आहे.

हरियाणात विधानसभेच्या ९० जागांसाठी निवडणूक होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला हरियाणात फटका बसला होता. २०१९ साली त्यांना हरियाणात १० जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना फक्त पाच जागा जिंकण्यात यश मिळाले. हरियाणामध्ये बिश्नोई समाजाची संख्या बऱ्यापैकी आहे. बिश्नोई समाजाचे मूळ हे शेजारच्या राजस्थान राज्यात असले तरी गेल्या काही वर्षांत अनेकजण हरियाणामध्येही स्थायिक झाले आहेत. त्यामुळे या समाजाची मते सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची ठरणार आहेत.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट