मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

फेसबुक वापरत असाल तर सावधान...

आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यात वाढ

नवी मुंबई : इंटरनेटच्या जगात ऑनलाईन व्यवहारांवर जास्त भर दिला जात आहे. हे जरी व्यवहारासाठी सोईस्कर असले तरी आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले असून सायबर गुन्ह्येगारी वाढली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सन 2020 मध्ये अशा स्वरुपाचे एकूण 10 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी फेसबुकच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून करण्यात आले आहे.   

सायबर गुन्हेगाराकडून फेसबुकवरील एखाद्या व्यक्तीचे नाव, फोटो यांचा वापर करुन त्याच नावाने दुसरे बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले जाते. त्यानंतर सायबर गुन्हेगारांकडून त्या व्यक्तीच्या बनावट फेसबुक अकाऊंटवरुन त्या व्यक्तीच्या फ्रेंडलिस्ट मधील अनेक व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून फेसबुकवरील मित्रांशी संपर्क साधला जातो. त्यानंतर तो व्यक्ती अडचणीत असल्याची वेगवेगळी कारणे सांगून फेसबुकवरील मित्रांकडे पैशाची मागणी केली जाते. फ्रेंडलिस्टमधील काही व्यक्ती सायबर गुन्हेगारांच्या अशा भुलथापांना बळी पडतात, तसेच सायबर गुन्हेगारांने दिलेल्या बँक खात्यात अथवा पेटिएम खात्यात पैसे पाठवून देतात. विशेष म्हणजे या स्वरुपाच्या गुह्यामध्ये अनेक नामांकित व्यक्तींच्या नावाने बनावट फेसबुक तयार करुन त्याद्वारे आर्थीक फसवणूक केल्याचे तपासात आढळून आले आहे.  

तर दुसर्‍या प्रकारात बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन फ्रेंडलिस्ट मधील अनेक व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून संपर्क साधला जातो. तसेच त्यांच्याकडून व्हाट्सअप नंबर घेतला जातो. त्यानंतर ज्या व्यक्तीच्या नावाने बनावट फेसबुक तयार करण्यात आले आहे, त्या व्यक्तीचा फोटो व्हॉट्सअपच्या डिपीवर ठेवून व्हॉट्सऍपव्दारे त्यांच्या मित्रांना संपर्क साधुन तो अडचणीत असल्याची वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्यांकडे पैशाची मागणी केली जाते. काही व्यक्ती त्या व्यक्तीच्या व्हाट्सअप वरील डिपी पाहून त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेऊन त्याने दिलेल्या बँक खात्यात किंवा पे टिएम खात्यात पैसे पाठवितात. तिसर्‍या प्रकारामध्ये सायबर गुन्हेगार विशेषत: मुली किंवा स्रियांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन तरुण मुले व पुरुषांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून संपर्क साधतात. तसेच त्यांचा व्हॉट्सऍप नंबर मिळवितात. त्यानंतर फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून अथवा व्हाट्सऍपद्वारे तरुण मुले व पुरुषांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधुन त्यांचे अश्लील अवस्थेतील व्हिडिओ तयार करतात. त्यांनतर त्या व्यक्तीला सदरचा अश्लील व्हिडिओ पाठवून, तो व्हिडिओ फ्रेंडलिस्ट मधील मित्रांना पाठविण्याची अथवा यूटयूबवर पाठवून देण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे पैशाची मागणी केली जाते. काही व्यक्ती त्या व्यक्तीच्या धमकीला घाबरुन त्याने दिलेल्या बँक खात्यात पैसे भरतात. तर चौथ्या प्रकारात सायबर गुन्हेगार सुंदर तरुणाच्या फोटोंचा वापर करुन बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन अनेक तरुणी व स्त्रियांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री करतात. त्यानंतर फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधुन चॅटींग करतात. तसेच त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून व्हाट्सऍप नंबर प्राफ्त करतात. त्यानंतर ती व्यक्ती अपघात झाल्याचा अथवा अन्य बहाणा करुन अडचणीत असल्याचे भासवून बँक खात्यात पैसे भरण्यास सांगतात, अनेक तरुणी अथवा स्रिया त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन त्याने दिलेल्या बँक खात्यात पैसे भरतात. अशा पद्धतीने फसवणुकिचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.  

आधुनिक तंत्रज्ञान वापरताना दक्षता न घेतल्यामुळे बहुतांशवेळा ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार घडतात. फेसबुक, इन्स्टाग्राम यासह इतर ऑनलाईन एप्लिकेशन वापराचे ज्ञान पूर्णपणे आत्मसात करुनच त्याचा वापर करावा. इंटरनेटच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात राहू नये. अथवा आपली माहिती कुणालाही देऊ नये. अशा स्वरुपाची दक्षता घेतली गेली तर आपली फसवणूक टाळता येऊ शकते. हे आरोपी परराज्यातून बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून सिमकार्ड मिळवून फसवणुकीचे कॉल करतात, त्यामुळे त्यांचा शोध घेणे अवघड असले तरी या आरोपींना पकडण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जात असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपयुक्त प्रविणकुमार पाटील यांनी सांगितले.

 फेसबुकच्या माध्यमातून आर्थिक फसवणुक होऊ नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी.   

  1. स्वत:चे फेसबुक प्रोफाईल लॉक करावे, व अनावश्यक फेसबुक खाते कायमचे डिलिट करुन टाकावे  
  2. फेसबुकवर स्वत:चे फोटो व अन्य महत्वाची माहिती शेअर करु नये. 
  3. अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नये. 
  4. फेसबुकवरुन पैशाची मागणी केल्यानंतर त्या व्यक्तीला प्रत्यक्ष संपर्क करुन शहानिशा करावी. 
  5. बनावट फेसबुक अकाऊंट बंद करण्यासाठी जास्तीत जास्त व्यक्तींकडून तत्काळ फेक अकाऊंट असे रिपोर्ट करावे.  
  6. अनोळखी व्यक्तींशी अश्लील संभाषण करु नये. 
  7. फेसबुकव्दारे मैत्री झालेल्या फ्रेंडशी आर्थिक व्यवहार करु नये, समक्ष भेटून त्या व्यक्तीची खात्री करावी. तसेच त्या व्यक्तीची सार्वजनिक ठिकाणीच भेट घ्यावी.  
  8.  शहानिशा न करता व प्रत्यक्ष न भेटता फेसबुकवरुन मैत्री किंवा लग्नाचे प्रपोजल स्विकारणे हे धोकादायक ठरु शकते. 

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट