Breaking News
(प्रदिप घोलकर)
आपले वय जसेजसे वाढत जाते तसतसा आपल्या स्नायूंवर, हाडांवर, साध्यांवर, मज्जातंतूवर आणि शरिरातील अतर ग्रंथीवर हळूहळू परिणाम होत असतो. वयानुसार त्यांची कार्यक्षमता कमी होत असते. त्यातून आपल्या आहाराच्या विहाराच्या सवयी योग्य नसल्या तर त्याचा शरिरावव आणि मनावर त्वरित परिणाम होतो आणि आपण आजारी पडतो.
सध्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युग असल्याने माणसाला सगळ्या जरुरीच्या गरजेच्या वस्तू चटकन हातात मिळतात. संगणक युग असल्याने माणुस बुद्धीलाही चालना देण्याचे काम फार कमी प्रमाणात करतो. त्यामुळ मेंदुचे कार्य कमी झाले आहे. शारिरीक हालचालही फार कमी हहोत चालल्या आहेत. जिमनॅशिअममध्येही यांत्रिक साधने आल्याने स्नायूू, हाडे, सांधे यांचे व्यायाम करता येतात. त्यामुळे शारिरीक, बौद्धीक, मानसिक व्यायाम हे सर्व कृत्रिम झाले आहेत. सुर्यनमस्कार, दंड बैठका, मलखांब, इतर शारिरीक व्यायाम तरुण पिढी विसरत चालली आहे. सरकारने योगाभ्यासाचा प्रचार केल्याने आंतरराष्ट्रीय स्थरावर योगा पोहचल्याने तरुण त्याचा सराव जेवणात चवीसाठी लोणच्याचे बोट लावल्यासारखा करतात, स्वयंस्फूर्तिसाठी योगाभ्यास करणारे करुण फारच कमी आढळतात.
लहान मोठ्या, वृद्ध, तरुण युवक युवती या सर्वांना अध्यात्मीक आणि परंपरागत योगाभ्यासाठी सुरुवात करावी त्यामुळे आपली व्यसन सुटतील, शरिर लवचिक होईल, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढेल. आज आपण एका अशाच आसनाचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे तुमचे मानसिक स्थैर्य वाढेल. शरिर लवचिक होईल,. गुडघे दुखीची समस्या कमी होईल आणि इतर बरेच फायदे मिळतील. त्याचे नाव आहे बद्धकोनासन. त्याला भद्रासन म्हटले जाते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya