Breaking News
*जर्नालिस्ट् युनियन ऑफ महाराष्ट्र व इंडियन जर्नालिस्ट् युनियन, नवी दिल्ली यांच्या बैठकीतील ठरावानुसार, देशात डिजिटल मीडिया चे वाढते अस्तित्व पाहता,प्रिंट मीडिया प्रमाणेच डिजिटल,इलेक्ट्रॉनिक मीडिया व त्यामध्ये काम करणाऱ्या माध्यमकर्मीना अधिकृत मान्यता द्यावी व केंद्र सरकारने अशा डिजिटल, इलेक्ट्रॉनिक, वेब मीडियाला सरकारी मान्यता द्यावी अशी आमची आग्रहाची मागणी राहीली आहे,प्रेस कौन्सिल पेक्षा प्रेस कमिशन सरकारने स्थापन करावे त्यामध्ये उपरोक्त समाज माध्यमांचा समावेश करावा,त्यांना सरकारने अधिकृत घोषित करावे अशी मागणी केंद्र सरकार,कामगार मंत्रालयाकडे केली आहे.
आपणही या मागणीला सरकारी मान्यता मिळेल अशी अपेक्षा करूनच व आपल्याकडे येत असलेल्या वाढत्या मागणीनुसार,महाराष्ट्रात जेयूएम च्या माध्यमातून डिजिटल मीडिया ची सुरुवात करायची आहे,माझी आपणास विनंती आहे की,जे पत्रकार डिजिटल मीडिया माध्यमातून पत्रकारिता करीत आहेत त्यांनी या संघटनेच्या महाराष्ट्र व्याप्त नोंदणीमध्ये सहभाग घ्यावा, "जेयूएम डिजिटल मीडिया"मध्ये सभासद व्हावे जेणेकरून लवकरच आपल्याला एक सभा आयोजित करून डिजिटल मिडियाचा व्यापक कार्यक्रम हाती घेता येईल,सर्व जेयूएम पदाधिकारी यांना विनंती आहे की, लवकरात लवकर डिजिटल मीडिया कार्यवाही सुरू करावी,धन्यवाद !*
आपला,
*नारायण पांचाळ,*
*अध्यक्ष, जेयूएम.*
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant