Breaking News
मुंबई : दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरातील मुख्य मार्गालगत असलेल्या ऐतिहासिक अशा कुलाबा पोस्ट ऑफिसचे नूतनीकरण करण्यात आले असून आज शुक्रवारी या पोस्ट ऑफिसचे उदघाटन मुंबई विभागातील पोस्टल सर्व्हिसेसच्या संचालिका कैया अरोरा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सर्कल, मुंबईचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मुंबई दक्षिण विभागातील पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधीक्षक डॉ. संजय लिये,पोस्ट निरीक्षक हणमंत चिरमे, नितीन म्हेत्रे, उपविभागीय निरीक्षक
मुंबई दक्षिण विभाग, कुलाबा पोस्ट मास्तर उषा कृष्णन, अकलेशकुमार मीना कार्यकारी अभियंता पोस्टल विभाग, पाटील, संतोष यादव, इलेक्ट्रिक पोस्टल विभाग, तसेच संजय कळसाने आणि अन्य सहकारी अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
सुसज्ज आणि ग्राहक - अनुकूल वातावरणात आधुनिक, कार्यक्षम आणि नागरिक-केंद्रित पोस्टल सेवा प्रदान करून ग्राहकांचा अनुभव वाढवण्याच्या उद्देशाने हे नूतनीकरण हाती घेण्यात आले.
पोस्ट विभाग समर्पणाने जनतेची सेवा करण्यासाठी आणि दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा सतत सुधारण्यासाठी वचनबद्ध आहे.
भारतीय पोस्टचे ब्रीदवाक्य "डाक सेवा- जन सेवा" आहे.
ब्रिटिश काळापासून या पोस्ट ऑफिसचे मोठे महत्व असून आधुनिक तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या युगातही सरकारी, निम सरकारी, सामाजिक संस्था, स्वराज्य संस्था आणि विविध आस्थापणे यांचा आजही पोस्ट विभागावरील असलेला विश्वास कायम असून विशेषत: भारतीय सैन्याच्या जवानांना आजही डाकसेवा प्रिय आहे. नोकरीचे कॉल,सुरक्षित पोस्ट आर्थिक गुंतवणूक अशा विविध सेवा जनतेपर्यंत पोहचविण्यात पोस्ट खाते यशस्वी ठरले आहे. असे उपस्थित कर्मचारी, अधिकारी वर्गास संबोधन करताना मुंबई मुख्य पोस्ट मास्तर जनरल अमिताभ सिंग यांनी म्हटले.
उपस्थित तरुण विद्यार्थ्यांना त्यांनी मोलाचा संदेश देताना म्हटले कि पोस्टाचे कर्मचारी, पोस्टमन हे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या ऋतूत न थकता लोकांना सेवा देत असतात त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि अविरत कष्टाचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेऊन प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास करा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी व्हा.तुम्ही भारताचे यशस्वी नागरिक म्हणून नांव कमवा.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant