Breaking News
राजस्थानातील दोन भावांकडून गुंतवणूकदारांची 2,676 कोटींची फसवणूक
जयपूर - राजस्थानातील सुभाष बिजाराणी आणि रणवीर बिजाराणी या दोन भावांनी नेक्सा एव्हरग्रीन नावाची बनावट कंपनी स्थापन करुन गुजरातमधील ‘धोलेरा स्मार्ट सिटी’मध्ये उच्च परतावा आणि जमिनीचे भूखंड देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना तब्बल 2,676 कोटींचा गंडा घातला आहे. बिजाराणी बंधूंनी 70 हजारांहून अधिक लोकांना घरे, भूखंड आणि स्मार्ट सिटीमध्ये जास्त परताव्यांचे आमिष दिले. आता हा घोटाळा उघडकीस आला आणि ईडी बिजाराणी बंधूंच्या लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकत आहे.
राजस्थानातील सिकर शहरातील दोन भावांनी – सुभाष बिजाराणी आणि रणवीर बिजाराणी – धोलेरा स्मार्ट सिटीच्या नावाखाली 70 हजार लोकांकडून कोट्यवधी रुपये लुबाडले. रणवीर बिजाराणीने 2014 मध्ये धोलेरा येथे जमीन खरेदी केली होती आणि भाऊ सुभाषने सैन्यातून निवृत्त होऊन परतल्यावर त्याच्याकडील 30 लाख रुपये धोलेरा येथे जमिनीत गुंतवले. दोघांनी लोकांना भूखंड, फ्लॅट, जमीन आणि चांगल्या परताव्याच्या नावाखाली या स्मार्ट सिटीमध्ये गुंतवणूक करायला भाव पाडले. लोकांना या योजनेचा भाग बनवण्यासाठी भावांनी 1500 कोटी रुपये कमिशन म्हणून वाटले.
त्यानंतर कंपनीने हळूहळू आपली कार्यालये बंद करण्यास सुरुवात केली आणि कंपनीची कार्यालये एका रात्रीत गायब होऊ लागली. कंपनीविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल होऊ लागल्या आणि प्रकरण उघडकीस येताच ईडीने झुंझुनू, सिकर, जयपूर आणि अहमदाबादमधील 25 ठिकाणांवर छापे टाकले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant