Breaking News
लवकरच बाजारात येणार Meesho चा IPO
प्रसिद्ध ई-कॉमर्स स्टार्टअप Meesho आयपीओ आणण्याच्या प्रक्रियेत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. Meesho आपले मुख्यालय अमेरिकेच्या डेलवेअर येथून भारतात हलवत आहे आणि ही प्रक्रिया पुढील काही दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचे मुख्यालय भारतात आणणे हे आयपीओ आणण्याच्या प्रयत्नांमधील एक मोठे पाऊल आहे, कारण यानंतरच ते बाजार नियामक सेबीकडे आयपीओचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल करतील. म्हणजेच, भारतात येणे हे आयपीओ ड्राफ्ट दाखल करण्याच्या दिशेने अंतिम पाऊल आहे. एकदा ते भारतात परत आले की, काही आठवड्यांतच ड्राफ्ट दाखल केला जाईल.
या आठवड्याच्या सुरुवातीला मीशोने आपल्या आयपीओ योजनेला बळ देण्यासाठी एका पब्लिक कंपनीत रूपांतरित झाली. यापूर्वीच खुलासा केला होता की, कंपनी आयपीओद्वारे सुमारे ८,३५० कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्याची अपेक्षा आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar