Breaking News
राज ठाकरेंसोबत दिल से नातं जोडणार… मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या युतीवर संजय राऊतांचं मोठं विधान
आपण मनसेसंदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मनसे आणि दिलसे भूमिका आहे, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना मनसे युती संदर्भात केले आहे. तर ठाकरे ब्रँड कधी संपणार नाही. ईस्ट इंडिया कंपनी सुरतचे मालक म्हणताय की, जोपर्यंत पवार आणि ठाकरे ब्रँड संपत नाही, तोपर्यंत मुंबई आपल्याकडे घेता येणार नाही. पण मी सांगतो, या देशातून मोदी, फडणवीस, शाह ही नावं पुसली जातील, असा हल्लाबोल देखील त्यांनी केलाय.
संजय राऊत म्हणाले की, मराठी माणसासाठी सर्व काही बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. आमच्याशी उद्धव ठाकरे यांची चर्चा झालेली आहे.कालही आम्ही बोललो. आपण मनसेसंदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनसे आणि दिलसे भूमिका आहे. मराठी माणसासाठी एकत्र येणं हीच खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी मानवंदना ठरेल, असे त्यांनी म्हटले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar