Breaking News
मुंबईत आढळले मान्सुनचे संकेत देणारे वैशिष्ट्यपूर्ण समुद्रीजीव
मुंबई -आठवडाभरापासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अंदमानात लवकरच मान्सून धडकणार असल्याचेही काल IMD ने जाहीर केले. त्यानंतर आता मान्सूनच्या आगमनाचे संकेत देणारा एक निसर्ग अविष्कार मुंबईत दिसून आला आहे. मुंबईतील जूहू समुद्रकिनाऱ्यावर ब्लू बॉटल जेलीफिश पाहायला मिळाले. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ब्लू बॉटल जेलीफिश आले होते. वर्षातून एकदाच हे जेलीफिश किनाऱ्यावर येतात. साधारणतः पाऊस येण्याच्या काही आठवडे आधी हे जेलीफिश किनाऱ्यावर येतात. त्यामुळं लवकरच मान्सून मुंबईत दाखल होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
ब्लू बटन्स म्हणून ओळखले जाणारे जेलीफिश पॅसिफिक अटलांटिक आणि हिंद महासागरांच्या उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय पाण्यात आढळतात. मुंबईत पावसाळ्या सुरू होण्यापूर्वी शहराच्या किनाऱ्यावर येतात. विशेषतः मच्छिमार या प्राण्याना पावसाचे संकेत देणारे नैसर्गिक सूचक मानतात.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे