Breaking News
देशातील पहिले Quantum valley टेक पार्क या राज्यात
राज्याच्या आधुनिकतम क्वांटम व्हॅली टेक पार्क चे उद्घाटन १ जानेवारी २०२६ रोजी होईल. हे भारतातील पहिले आणि अत्याधुनिक क्वांटम टेक पार्क असेल, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज जाहीर केले. या निर्णयामुळे भारताचा क्वांटम संगणक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक प्रभाव वाढण्यास मदत होईल. हे केंद्र देशातील संशोधकांना, उद्योजकांना आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोदितांना नवे संधी देईल.
मुख्यमंत्री नायडू यांनी IBM, TCS आणि L&T या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांसोबत करार केला आहे, ज्यामध्ये IBM चा १५६-क्यूबिट क्वांटम सिस्टम टू समाविष्ट असेल. हा देशातील सर्वात मोठा क्वांटम संगणक प्रणाली ठरणार आहे.
क्वांटम तंत्रज्ञानाचा जागतिक केंद्रबिंदू
राजधानी अमरावतीतील हे टेक पार्क भारताच्या क्वांटम संशोधन, नवकल्पना आणि प्रगत तंत्रज्ञानासह नव्या पर्वाची सुरुवात करेल. शैक्षणिक संस्थां, स्टार्टअप्स आणि जागतिक भागीदारांना एकत्र आणून, हे तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन ‘सिलिकॉन व्हॅली’ बनेल, असे नायडू यांचे उद्दिष्ट आहे.
नायडू यांनी म्हटले की, “ही संकल्पना केवळ आंध्र प्रदेशासाठी नाही तर संपूर्ण भारताच्या प्रगत तंत्रज्ञान भविष्यासाठी महत्त्वाची आहे.” क्वांटम कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या संधींना चालना देण्यासाठी हे तंत्रज्ञान केंद्र विकसित केले जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar