Breaking News
समता,एकता,हक्कासाठी लढू! रामिम संघाचे कामगारदिनी आवाहन
मुंबई - आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने अध्यक्ष आमदार सचिन अहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी सर्व कामगार वर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत.शुभेच्छा पत्रकात पुढे म्हटले आहे,1 मे 1886 मध्ये शिकागो मधील कामगारांनी आठवड्याच्या सुट्टीसाठी संप केला. त्यातून रक्तरंजीत क्रांती घडली.तो दिवस आंतरराष्ट्रीय कामगारदिन म्हणून जगभरात संपन्न होतो आहे, त्या औचित्याने स्वातंत्र्य, एकता, समता, बंधुत्वासाठी वचनबध्द होऊ! तत्पूर्वी महाराष्ट्रात कै.नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1884 मध्ये गिरणी कामगारांचा लढा उभारुन रविवारच्या सुट्टीचा अधिकार मिळवून दिला आणि देशात कामगार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
1947 मध्ये कामगार महर्षी स्व.गं.द.आंबेकर यांनी मुंबईत राष्ट्रीय मिल मजदूर संघ, या बलाढ्य कामगार संघटनेची स्थापना केली,आज ही वास्तू कामगार लढ्याचे प्रमुख केंद्र बनले आहे. आज बंद एनटीसी गिरण्या चालू करण्याचा प्रश्न आहे! विशेषत: गिरणी कामगार हक्काच्या घरांच्या प्रश्नवर सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन लढण्याची प्रतिज्ञा करण्याचा हा दिवस आहे.
देशाचा स्वातंत्र्यलढा असेल किंवा सयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल मुंबईतील गिरणी कामगारांनी हौतात्म्य पत्कारून इतिहास घडवला. महाराष्ट्राच्या वैभवातही मोलाचे योगदान दिले. तेव्हा आजचा एक मे महाराष्ट्रदिन चिरायू ठरो, अशाही मनोकामना अध्यक्ष आमदार सचिन अहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी पत्रकाच्या शेवटी दिल्या आहेत.
सर्वश्री खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण,सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे यांनीही कामगार दिनानिमित्त कामगार वर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्र इंटकच्यावतीने कामगारदिना निमित्ताने कामगार वर्गाला सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी शुभेच्छा देऊन महाराष्ट्र वर्दापन दिनानिमित्ताने राज्याच्या उज्वल प्रगती आणि विकासासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत!
सरकारने गिरण्या चालवावयास पुढाकार घ्यावयास हवा.
बंद एनटीसी गिरण्यांच्या इंदू क्र 5 कामगारांच्या महापूजेला सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी भेट देऊन कामगारांपुढे बोलताना सांगितले, कामगार श्रम करायला अधिर आहेत. मात्र सरकारने गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून बंद असल्याने या गिरण्या चालवावयास पुढाकार घ्यावयास हवा.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar