Breaking News
पहलगाम हल्ल्या प्रकरणी तटस्थ चौकशीसाठी पाकिस्तान तयार
इस्लामाबाद - पहलगाममध्ये मंगळवार (दि. २२) रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २६ पर्यंटकांचा बळी गेला. त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात पाकचा सहभाग असल्याचे पुरेसे पुरावे असल्याचे पंप्रधान मोदींनी म्हटले आहे. पहलगाम येथे झालेला हा हल्ला पाकिस्ताननेच केल्याचा दावा भारताने तांत्रिक बुद्धिमत्ता आणि विश्वसनीय माहितीच्या आधारावर केला आहे, या दाव्यानंतर पाकिस्तानने आपली भूमिका स्पष्ट केली, पाकिस्तानने आता तटस्थ चौकशीला तयारी दर्शवली आहे.
भारताचे पाक विरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाकच्या नागरिकांना तत्काळ भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हल्ल्याला भारताने पाकिस्तानला जबाबदार धरलं आहे. मात्र, पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी घेणं टाळलं आहे. या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ म्हणाले आहेत. आता या ही पुढे जाऊन पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही प्रतिक्रिया देत पाकिस्तान या हल्ल्याप्रकरणी ‘तटस्थ चौकशी’ला तयार असल्याचं म्हटलं आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar