Breaking News
कोसुंब गावाच्या वतीने लोकाभिमुख कार्यसम्राट आमदार शेखरजी निकम सर यांचा भव्य सत्कार
चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार शेखरजी निकम सर यांनी आपल्या संपूर्ण मतदारसंघात कोट्यावधीचा निधी आणण्यासाठी अहोरात्र मेहनत व प्रसंगी आपल्या तब्येतीची काळजी न घेता मतदार संघासाठी विविध प्रकारची विकासात्मक कामाकरता वेळप्रसंगी अत्यंत कठोर अशी भूमिका घेऊन विविध प्रकारचा निधी आणण्यात त्यांनी यश मिळविले आहे. कोकणातील ज्वलंत प्रश्नांची विधानसभेत परखड व मुद्देसूद मांडणी करून ती पूर्ण करण्याकरता कसोशीचे प्रयत्न याचाच एक भाग म्हणून लोकांनी त्यांना कार्यसम्राट आमदार अशी उपाधी दिलेली आहे .ज्या ठिकाणी आव्हानात्मक काम असते त्या ठिकाणी आमदार शेखरजी निकम सर आपल्या सर्वांच्या बाजूने ठामपणे उभे राहून ते काम यशस्वी करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम करत असतात.
श्री देवी जुगाई कोसुंब येथे कोयना भूकंप निधी मधून संरक्षण भिंतीला निधी मंजूर करून दिल्याने संपूर्ण कोसुंब गावाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ ,श्री देवी जुगाईची प्रतिमा व आभार पत्र देऊन सत्कार व आभार व्यक्त करण्यात आले . गावामध्ये एखादे चांगले काम होत असेल तर संपूर्ण कोसुंब गाव त्याच्या पाठीशी खंबीरपणे समर्थपणे उभा असतो त्याचा प्रत्यय या निमित्ताने दिसून आला.
कोसुंब गावाचा केला सर्वांगीण विकास
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar