Breaking News
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ
मुंबई - देशभर उष्णतेची लाट उसळलेली असतानाच आता महागाईचा भडकाही उडाला आहे. उद्यापासून घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली. सध्या दिल्लीत गॅस सिलिंडर ८०३ रुपयांना उपलब्ध आहे. किमती वाढल्यानंतर ही किंमत ८५३ रुपये होईल. तर मुंबईत हीच किंमत आधी 802.50 रुपये होती, ती आता 852.50 रुपये होईल. सरकारने शेवटच्या वेळी ८ मार्च २०२४ रोजी महिला दिनी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची कपात केली होती. त्यावेळी दिल्लीत सिलिंडरची किंमत ९०३ रुपये होती.
घरगुती वापराचा गॅस सिलेंडरचे दर वाढवण्यासोबतच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क वाढवले. या शुल्कात २ रुपये लीटर इतकी वाढ केली. केंद्र सरकारकडून सांगण्यात आले की, यामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढणार नाहीत. हा खर्च पेट्रोलियम कंपन्या करतील. मंत्री पुरी यांनी म्हटले की, पेट्रोल डिझेलवर वाढवण्यात आलेल्या उत्पादक शुल्काचा उद्देश हा ग्राहकांवर ओझे टाकण्याचा नाही.
नवीन किमती उद्यापासून म्हणजेच ८ एप्रिलपासून लागू होतील. तेल कंपन्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे उद्यापासून ५० रुपये अधिक किंमतीला सिलेंडर सर्वांना विकत घ्यावा लागणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant