Breaking News
दीनानाथ रुग्णालय दोषी, चौकशी अहवालात उघड
दीनानाथ रुग्णालयाने उपचार नाकारल्यानं गर्भवतीचा मृत्यू झाल्याच्या आरोपाची घटना काही दिवसांपूर्वी घडली. यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. दीनानाथ रुग्णालयात घडलेल्या प्रकरणी आता चौकशी अहवाल समोर आला आहे. यात धक्कादायक खुलासे झाले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चौकशी अहवालाबाबत माहिती दिली. या अहवालानुसार रुग्णालय दोषी आढळले असून रुग्णालयाने कोणतेही नियम पाळले नसल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. २८ मार्चला गर्भवती महिलेला रक्तस्राव होऊ लागल्याने त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यानुसार त्यांनी रुग्णालयात येण्यास सांगितलं.
रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्याअगोदर त्यांच्याकडून १० लाखांची मागणी केली. हे सर्व रुग्णासमोरच सुरू होतं. ते तीन लाख रुपये भरायला तयार होते. इतर पैशांची व्यवस्था आम्ही उद्यापर्यंत करू, असंही म्हणाले. मग मंत्रालयातून आणि विभागातून फोन गेले. तरीही याची दखल घेतली नाही. त्यामुळे रात्री अडीच वाजता रुग्ण बाहेर पडला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतानाही रुग्णावर कोणतेही उपचार झाले नाहीत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar