NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

निसर्ग उन्नत मार्गाला अवघ्या २ दिवसांत ३४०० पर्यटकांचा प्रतिसाद!

निसर्ग उन्नत मार्गाला अवघ्या २ दिवसांत ३४०० पर्यटकांचा प्रतिसाद!

मुंबई - मलबार हिल परिसरातील ‘निसर्ग उन्नत मार्ग’ मुंबईकर नागरिकांच्या प्रचंड पसंतीला उतरला आहे. रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी लोकार्पण झाले, त्या दिवसापासूनच याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटक आणि नागरिकांची संख्या मोठी आहे. आज सार्वजनिक सुटीच्या निमित्ताने ऑनलाईन तिकिट नोंदणीचे सर्व स्लॉट नोंदणी पूर्ण (हाऊसफुल्ल) झाली. तसेच येत्या आठवडाभराच्या कालावधीसाठीही नागरिकांनी आगाऊ तिकिट नोंदणी केली आहे.

निसर्ग उन्नत मार्गाला भेट देण्यासाठी काल पहिल्या दिवशी (३० मार्च ) १ हजार ५३ नागरिक व पर्यटकांनी भेट दिली. या तिकिट नोंदणीतून २६ हजार ९२५ रुपये इतका महसूल प्राप्त झाला. तर आज (३१ मार्च ) २ हजार ३४६ नागरिक व पर्यटकांनी या स्थळाला भेट दिली. या नोंदणीतून ६० हजार ३०० रूपयांचा महसूल प्राप्त झाला. तसेच आठवड्याच्या अखेरसाठीही मोठ्या प्रमाणात तिकिट नोंदणी होत आहे.

निसर्ग उन्नत मार्गाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या अनुषंगाने सोयीसुविधांची प्रभावी अंमलबजावणी करावी; सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच पर्यावरणदृष्ट्या नियमित स्वच्छतेसाठी प्राधान्य देण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. मुंबईत पर्यटकांसाठी हा एक आदर्श प्रकल्प ठरणार आहे, त्यामुळे याठिकाणी परिरक्षणाच्या अनुषंगाने विशेष काळजी घेण्याचेही निर्देश श्री. गगराणी यांनी दिले आहेत.

झाडांमधून मार्गिका विकसित करताना निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहचवता हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. दररोज पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत पर्यंत हा मार्ग खुला राहणार आहे. निसर्ग उन्नत मार्ग येथे पर्यटकांचा मोठा प्रतिसाद आणि ऑनलाईन मर्यादित स्लॉट लक्षात घेता नागरिक व पर्यटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

अशी करा तिकिट नोंदणी

मलबार हिल येथील निसर्ग उन्नत मार्गाला भेट देण्यासाठी????naturetrail.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन Book Now वर क्लिक करा. ????

1⃣????️ तारीख आणि हवा असलेला कालावधी (स्लॉट) निवडा.

2⃣ Next वर क्लिक करून माहिती भरा.

3⃣ पुन्हा Next वर क्लिक करून उजव्या बाजूला संख्या निश्चित करा.

4⃣ Next वर क्लिक करून शुल्क भरा.

???? ऑनलाईन सशुल्क तिकिट प्रणालीचा वापर करून पहाटे ५ ते रात्री ९ दरम्यान निसर्ग उन्नत मार्गाला भेट देता येईल.

???? भारतीय नागरिकांसाठी २५ रुपये तर परदेशी नागरिकांना १०० रुपये प्रवेश शुल्क.

???? एकाचवेळी जास्त गर्दी होऊ नये, यासाठी एका स्लॉट मध्ये २०० व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल.

???? हा मार्ग पाहण्यासाठी प्रत्येकी एका तासाचा कालावधी (स्लॉट) आहे. तसेच ऑनलाईन तिकिट नोंदणीत निर्माण झालेल्या बारकोडच्या सहाय्यानेच प्रवेश मिळणार आहे.


रिपोर्टर

  • Rejendra Salaskar
    Rejendra Salaskar

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Rejendra Salaskar

संबंधित पोस्ट